संगमनेर – राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात आयोजित कार्यक्रमात थोरात पती-पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत चांगलीच वाढली. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.
माझं राजकरण काम सगळ्यांना माहीत.. मात्र सौभाग्यवती कांचनने अनेक किस्से सांगितले.. मी आधी जोर्वे गावात राहायचो.. वडील आमदार असताना मी वकील झालो.. त्यावेळी लग्नाचा विषय आला..
मी विचार केला की आपल्याकडे रोजच इतके पाहुणे कार्यकर्ते येतात.. इथ टिकलं कोण हाच मा तेव्हा प्रश्न..मी महाविद्यालयात असताना मला तिथेच पाहुणे पाहायला आले. एका व्यापाऱ्याने त्यावेळी सांगितल की चांगला मुलगा आहे..
वकील आहे गोरा गोमटा आहे.. मी कांचनला पाहायला गेलो..तिथे त्यांचं घर व मोठ कुटुंब सदस्य पाहूनच ठरवलं हे आपल्याकडे बरोबर जमेल.. कोण चालेल आपल्या घरी ही दूरदृष्टी आणि अचूक निर्णय माझा ठरला..त्यामुळे कटकट नावाचा प्रकार आजपर्यंत नाही..
तुमचं तुम्हाला माहीत.. अनेकांच्या घरात रोज सुरूच असत. नवरा बिचारा काम करून येतो..आणि घरी आले का बायको म्हणते आले का फिरून..तो दमून आलेला असतो आणि असा प्रश्न येतो जसा तो बागेत फिरायला गेलेला असतो.. असा काही त्रास मला नाही.. माझा निर्णय बिनचूक ठरला हे आज कळत..
