मेष : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोरंजनाकडे कल राहील.
सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवी दिशा, मार्ग सापडेल.
तुळ : गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
धनु : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.
कुंभ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : नवीन हितसंबंध निर्माण होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
