हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील तीन दिवस…. 

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भालगत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. विदर्भातील अमरावती, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत आज मेघगर्जनेसह पाऊस झाला. पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश भागात हलका ते जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांत मेघगर्जनेसह गारपीट होईल. मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात लातूर, नांदेडमध्ये हलका पाऊस पडेल.

Leave a Comment