बिरेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहात सुरूय अनोखा उपक्रम

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजेनिमीत्त अखंड हरिनाम सप्ताहाला २१ मार्चपासून प्रारंभ झालाय. ब्रम्हलीन माणिकगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तर मठाधिपती दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाने ५४ व्या वर्षांत पदार्पण केलय.

दरम्यान यंदाच्या वर्षी सप्ताहानिमित्ताने निलेश बाबाजी सागर यांच्या संकल्पनेतून एक खास उपक्रम देखील राबविण्यात आलाय. कै. रखमा गंगाराम सागर यांच्या स्मरणार्थ बाबाजी रखमा सागर, मनीषा बाबाजी सागर, निलेश बाबाजी सागर व गणेश बाबाजी सागर यांच्या वतीने दररोज एका भाग्यवान भाविकाला ज्ञानेश्वरी देण्यात येणार आहे.

विशेषतः एक बॉक्समध्ये गावातील प्रत्येक ग्रामस्थांच्या नावाची चिठ्ठी बनवण्यात आली. दररोज जे किर्तनकार सेवा देणार आहे त्यांच्या हस्ते एक चिठ्ठी काढण्यात येणार आहे. ज्या ग्रामस्थाच्या नावाची चिठ्ठी निघेल त्या एका ग्रामस्थाला ज्ञानेश्वरी देण्यात येणार आहे.

यामध्ये पहिल्या दिवसाचे ज्ञानेश्वरी चे भाग्यविधाते संतोष दामू भोसले हे ठरले आहे. मठाधिपती दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते त्यांना ज्ञानेश्वरी सुपुर्द करण्यात आली.

Leave a Comment