नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील दोन महिन्यांत…..

पुण्यासह राज्यात उकाडा कमालीचा वाढत असतानाच हवामान विभागाने येत्या दोन महिन्यांत उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. येत्या दोन महिन्यात पारा चाळीस अंशाच्या आसापास राहण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अल निनो परिस्थितीमुळे यंदाचा उन्हाळा तीव्र आहे. मार्च महिन्यात यामुळे उकाडा वाढल्याचा अनुभव येत आहे. आगामी ६० दिवस राज्यात उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. मार्चमध्येच लाटा तीव्र झाल्याने समुद्राचे पाणीही यंदा लवकर तापल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडी होती. त्यामुळे उन्हाळा कमी जाणवेल असा अंदाज सुरुवातीला होता. मात्र, मार्चच्या दुसर्‍या आठवड्यातच राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली. शहराहसह राज्याच्या अनेक भागांत पारा मार्चमध्येच चाळीशीला जाऊन आला. मार्चच्या तिसर्‍या आठवड्यात ही लाट अधिक तीव्र झाल्याने सध्या महाराष्ट्राचा पारा देशात सर्वाधिक आहे. या हवामानामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढला असून, समुद्राचे पाणी लवकर तापते आहे.

यंदा अल निनो स्थिती मेअखेरपर्यंत सक्रिय राहणार असल्याने कडक उन्हाळ्याचा अंदाज हवमान विभागाने दिला होता. मार्च महिन्यात देशात सर्वांत कमी पाऊस झाला. पूर्वोत्तर भारतातच सरासरी इतका पाऊस झाला. राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांत सरासरीपेक्षा पाऊस ६० टक्के कमी झाला आहे. त्याचा ही परीणाम जाणवत आहे.

Leave a Comment