मोठी बातमी! महावितरणच्या वीज दरात वाढ….

आजपासून महावितरणच्या वीज दरात वाढ करण्यात आली आहे. वीज बिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून आजपासून नवे दर लागू करण्यात येणार आहेत.

त्यामुळे महावितरणच्या (Mahavitran) ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. नवीन आर्थिक वर्ष आजपासून सुरु होत असून 1 एप्रिलपासूनच हे नवे वीज दर लागू करण्यात आले आहेत.

महावितरणने ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका दिला आहे. आजपासून वीजबिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणच्या वीजग्राहकांना 1 एप्रिलपासून वीजदरवाढीचा शॉक बसणार आहे. परिणामी वीजबिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे.

Leave a Comment