मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या गाडीचा अपघात 

मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला सोमवारी दुपारी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये चंद्रकांत पाटील यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

सोमवारी दुपारी मुक्ताईनगर तालुक्यातील जुना कुंड रस्त्यावर हा अपघात घडला. चंद्रकांत पाटील (Chandrakatn Patil) यांच्याच ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे ही दुर्घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासह सुरक्षा वाहनातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

या दुर्घटनेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मुक्ताई नगरवरून आम्ही जुना कुंड रस्त्याने जात असताना काही शेतकरी आपल्यासाठी रस्त्यावर थांबून होते. त्यांना पाहून आपण चालकाला आपली गाडी थांबविण्यास सांगितले. आमची गाडी रस्त्यावर थांबली होती. मात्र, त्यावेळी आमच्याच ताफ्यामध्ये असलेली सुरक्षारक्षकांच्या गाडीचा ब्रेक न लागल्याने ती आमच्या कारवर जोरात आदळली. यामध्ये मला आणि तीन पोलीस कर्चमाऱ्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुक्ताईनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Leave a Comment