भानसे पक्षाची पहिली यादी जाहीर, नगर दक्षिणमधून कलीराम पोपळघटांना उमेदवारी

पुणे(DSNews24/किरण पुरी) लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय नवजवान सेना पक्षातील उमेदवारांची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय पडवळ यांनी केलीय. यावेळी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे तीन उमेदवारांची घोषणा केलीय. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे अध्यक्ष संजय पडवळ निवडणूक लढविणार आहे.

तसेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून कलीराम बहिरू पोपळघट व बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव खेंगरे यांच्या नावांची घोषणा करण्यात आलीय.

राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा देखील संजय पडवळ यांनी केलीय. तसेच लवकरच उर्वरित जागांची यादी देखील जाहीर होणार आहे.

Leave a Comment