आज मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. अंदमान समुद्र तसेच बंगालच्या खाडीमध्येही मान्सून आज दाखल होणार आहे. भारताचे मुख्य भूमी म्हणजेच ३१ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
जूनमधील पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. निकोबार बेटावर गेल्या २४ तासात चांगला पाऊस झालाय.
