संगमनेर(DSNews24) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील रेवजी म्हतु सागर यांचं निधन झाल्याची बातमी समोर आलीय. वार – सोमवार दि. २० मे रोजी पहाटे 5.35 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एक सुसंस्कृत व्यक्तीमत्व म्हणून पंचक्रोशीत रेवजी सागर यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात बबन सागर, नाना सागर, आण्णा सागर, नवनाथ सागर, एकनाथ सागर अशी पाच मुले व लहानबाई बाळासाहेब भोसले, कमलबाई साहेबराव ढोकळे या दोन मुली, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.
रेवजी सागर यांच्या निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर वार – सोमवार दि. २० मे रोजी दुपारी 1:00 वा. बिरेवाडी ( सागर वस्ती ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
