अहमदनगरच्या एक्झिट पोलबाबत मंत्री विखे पाटलांच मोठं वक्तव्य, म्हणाले..

अहमदनगरची जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकणार, महाराष्ट्रात महायुतीला घवघवित यश मिळणार आहे. एक्झिट पोल आणि राजकीय विश्लेषक सध्या विश्लेषण करत आहेत. मात्र, सर्वांचे उत्तर चार तारखेला मिळणारच आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा आम्ही जिंकणार आहोत हा विश्वास होता.

सोशल मीडियातून जनतेमध्ये विष पेरणी करण्याचा कार्यक्रम झाला. पण शेवटी जनतेला कामावर विश्वास आहे. त्यापेक्षाही आमचे नेते नरेंद्र मोदी त्यांचं नेतृत्व, ज्या ज्या उमेदवाराला मिळाले अथवा पक्षाला मिळाले त्यात डॉ. सुजय विखे यांनाही त्यांचा आशीर्वाद आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचेही मार्गदर्शन आहे. या जोरावर अहमदनगरची जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे

Leave a Comment