Sanjay Raut : संजय राऊत यांना ‘या’ पदावरून हटवलं

खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी गजानन कीर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष यांना याबाबतचे पत्र दिले आहे.

शिवसेना पक्षाच नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारणीची फेब्रुवारीमध्ये बैठक पार पडली. यामध्ये शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी गजानन कीर्तीकर(Gajanan Kirtikar) यांनी निवड करण्यात यावी, असा प्रस्ताव मंजूर झाला होता.

त्याबद्दलचे अधिकृत पत्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकसभा अध्यक्षांना देण्यात आले. त्यानुसार खासदार राऊत यांना नेतेपदावरून हटवण्यात आले असून गजानन कीर्तीकर यांची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment