बिग ब्रेकिंग! ‘या’ वाहनांना टोल माफ, शिंदे सरकारचा मोठा निर्णय 

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.याबाबतचा जीआरही काढण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यभरातील विठुरायांना सध्या आषाढी एकादशीचे वेध लागले आहेत. पंढपुरला विठुरायांच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. अशातच राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पंढरपुरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफ केले आहेत.

१७ जुलै रोजी पंढपुरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरकडे जात असतात. या सर्व वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तीन जुलैपासून ते 21 जुलै पर्यंत ही टोलमाफी असणार आहे. अक्षय महाराज भोसले यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

दरम्यान, वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांना परिवहन विभागातून आवश्यक स्टिकर्स वाहनांना दिले जाणार आहेत. ३ जुलै ते २१ जुलै दरम्यान या कालावधीत ही सवलत राहणार आहे. गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरकडे येणारे सर्व नाक्याांवर ही टोलमाफी असेल.

Leave a Comment