विखे पालटांनी निलेश लंके यांना खूप त्रास दिला. त्यामुळेच निलेश लंके हे महाविकास आघाडीसोबत गेले असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक बैठकीमध्ये केलं होतं. यावरून महायुतीमध्ये खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांसारख्या नेत्यानं असं बोलणं योग्य नाही असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
अजित पवारांनी आचारसंहिता पाळावी. जेणेकरून महायुतीवर परिणाम होणार नाही. अशी उणी-धुणी काढायचं म्हटलं तर आम्ही देखील ते काढू. मला वाटतं अजित पवारांसारख्या नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर ते योग्य नाही. शिवाजीराव आढळराव पाटील भाजपकडून लढले असते तर आम्ही जिंकलो असतो, असं आम्ही म्हणू शकतो, असं दरेकर म्हणाले.
यासंदर्भात जेव्हा महायुतीमध्ये मेळावा झाला. त्यावेळी सोनाराने कान टोचले आहेत. नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलंय की, अशा प्रकारचे वक्तव्य कोणी करू नये. जर कोणाला खुमखुमीच असेल तर त्याने वरिष्ठांशी बोलावं आणि आपली खुमखुमी मिटवावी, असं देखील दरेकर म्हणाले आहेत.
