मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.
कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
सिंह : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
तुळ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.
वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मीन : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
