आषाढी एकादशी (Ashadhi Eakadshi) असल्याने राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये लिलाव बंद होते. काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची 44 हजार 281 क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला (Onion Market) सरासरी 1875 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.
आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिक माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याची (Kanda Market) कोल्हापूर बाजारात 2447 क्विंटल तर खेड चाकण बाजारात 900 क्विंटलचे आवक झाली. यात कोल्हापूर बाजारात 2200 रुपये, तर खेड चाकण बाजारात 2500 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याची अवघी 458 क्विंटलची आवक झाली. यात बारामती बाजार समिती 2300 रुपये तर भुसावळ बाजार समिती सर्वाधिक 03 हजार रुपयांचा दर मिळाला.
तर आज पुणे बाजारात लोकल कांद्याची 6 हजार 753 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला 2150 रुपये तर मंगळवेढा बाजारात 03 हजार रुपयांचा दर मिळाला. आज उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात 2600 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 2850 रुपये, पारनेर बाजार समितीत 2525 रुपये, तर वैजापूर बाजारात 2650 रुपयांचा दर मिळाला. आज उन्हाळ कांद्याची 28 हजार क्विंटलची आवक झाली.
