साकूर – सध्याचे युग हे स्पर्धात्मक आहे. या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आपण आपल्या करिअरची योग्य निवड केली पाहिजे. ध्येय निश्चिती करून शांतता व संयम ठेवून कठोर परिश्रम घेऊन अभ्यास केल्यास निश्चितपणे स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. महाविद्यालयाने सुरू केलेल्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन आपले उज्वल भवितव्य घडवावे असे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रमेश फिरोदिया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले. या उद्घाटन प्रसंगी इंद्रजित खेमनर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. हेमलता राठोड होत्या तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य दिपक फिरोदिया, उपप्राचार्य डॉ.सचिन घोलप, विवेकानंद अकॅडमीचे संचालक प्रशांत देशमुख, डीएस न्यूज २४ चे संपादक किरण पुरी, भाऊसाहेब नागरे, स्पर्धा परीक्षा केंद्र समन्वय प्रा. पोपट खेमनर उपस्थित होते.
यावेळी विवेकानंद अकॅडमीचे संचालक प्रशांत देशमुख म्हणाले की, स्पर्धा परीक्षा ही व्यापक संकल्पना आहे. या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी चांगले नियोजन, मेहनत व सरावाची गरज आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे चांगले नियोजन व वेळापत्रक तयार करून त्यांचे पालन करावे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता राठोड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी महाविद्यालय वेगवेगळे उपक्रम राबविते. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी प्रत्यक्षपणे आवश्यक असणारे कौशल्य प्रदान करण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी या उद्देशाने पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र महाविद्यालयात सुरू करत आहोत. दररोज दुपारी एक ते तीन या वेळेत लेखी परीक्षा व तीन ते चार या वेळेत मैदानी परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांची करून घेतली जाणार आहे. या सुवर्णसंधीचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा.
यावेळी राजेंद्र केंगार यांनी महाविद्यालयातील या उपक्रमाचे कौतुक केले व महाविद्यालयाचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी प्रा.म्हतू खेमनर, प्रा. रंजीत गिरी, प्रा. राजेंद्र लेंडे, प्रा. गणेश साळुंखे, प्रा.योगेश साळुंखे, शंकर राशिनकर, प्रा.गणेश कुलकर्णी, प्रा. दत्तात्रय असावले, प्रा. संदीप खेमनर, प्रा. लक्ष्मण कातोरे, प्रा. कल्पना शेळके, प्रा. प्राजक्ता बिडवे, प्रा. शबाना शेख, प्रा. जया रकटे, प्रा. स्वाती सागर, प्रा. आरजू शेख, प्रा.स्वाती धोकरे, प्रा. प्रियंका हाके, प्रा. वृषाली डोके, प्रा. शेख मॅडम, मनोहर दुरगुडे, महेश पोखरकर, पुंजाहरी वारे, लक्ष्मण जाधव, भाऊसाहेब बहिरट व सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर यांनी केले तर आभार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.पोपट खेमनर यांनी मानले.
