राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार गटाची साथ सोडली होती. यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना दुसरा धक्का बसणार आहे.
आणखी एक नेता अजित पवारांची साथ सोडणार आहे. अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे हे अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मोठा धक्का दिला आहे. अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे पाटील आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार आहेत. नांदेडमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना प्रशांत गोळे यांनी साथ सोडल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेते इतर पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवड येथील काही माजी नगरसेवकांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठे धक्के बसताना दिसत आहेत.
