ठाकरे गटाला मोठा धक्का, बडा नेता शिंदे गटात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटातून तीन वेळा नगरसेवक झालेल्या संध्या दोशी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

सलग तीन वेळा नगरसेविका

मुंबईतील कांदिवली चारकोप भागातील माजी नगरसेविका संध्या दोशी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. संध्या दोशी यांनी मशाल सोडत धनुष्यबाण हाती घेतला आहे. संध्या दोशी या मुंबई महापालिकेच्या माजी शिक्षण समिती अध्यक्षा आहेत. संध्या दोशी या सलग तीन वेळा चारकोप वार्ड 18 च्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत

Leave a Comment