मेष : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.
कन्या : हितशत्रूंवर मात कराल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
वृश्चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
मकर : आर्थिक लाभ होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
कुंभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
