दिल्ली: विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. लोकसभेत म्हणावे तेवढं यश भाजपच्या गोटात न आल्याने आता भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. विधानसभेसाठी कुठेही कमी पडू नये म्हणून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे.
यातच भाजपला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. मंत्रिपदामुळे नाराज असलेल्या प्रदेशाध्यक्षांनी चक्क राजीनामच दिला आहे. भाजपने मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले पंजाबचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांनी भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पंचायत निवडणुकीपूर्वी जाखड यांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने अद्याप जाखड यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. सुनील जाखड हे गेल्या काही काळापासून बैठकीलाही गैरहजर असल्याची चर्चा सुरू होत होती.
जाखड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तादरम्यान त्यांचे स्वीय सचिव संजीव त्रिखा यांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. त्रिखाने राजीनामा दिला नसल्याचे सांगितले. भाजप हायकमांडने रवनीत बिट्टू यांना मंत्री केल्याने सुनील जाखड नाराज असून त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहत असल्याची चर्चा होती. जाखड हे हरियाणातील पक्षाच्या प्रचार कार्यक्रमापासूनही दूर आहेत.
पंजाबमध्ये पंचायत निवडणुकांना सुरुवात झाली आहे. सुनील जाखड यांनी राजीनामा दिल्यानं पंजाबच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे, मात्र त्याला अद्याप कोणीच दुजोरा दिला नाही. जाखड यांच्या ट्विटर अकाउंटवर अजूनही भाजप पंजाब अध्यक्ष असं लिहिल्याचं दिसत आहे. 2022 आधी त्यांनी का काँग्रेसमध्ये असताना देखील अनेक वेळा आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसने स्वीकारला नव्हता. अखेर सुनील जाखड यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 2022 पासून काही ना काही कुरबुरी सतत सुरू आहेत. त्यात जाखड यांनी आता राजीनामा दिल्यानं आणखी चर्चा होत आहेत.
