Shambhuraj Desai : महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला, ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा (Corona) धोका वाढताना दिसतोय. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र असताना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

विशेष म्हणजे नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर आता मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

शंभूराज देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित याबाबत माहिती दिली आहे. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही”, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे.

“गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी”, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी फेसबुकवर केलं आहे.

Leave a Comment