नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुनी पेन्शन योजनेबाबतचे केंद्र सरकारचे सूर बदलले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता याविषयीचा एक फायदा लवकरच मिळण्याची चिन्हं आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याविषयीची घोषणा केली आहे. जुन्या पेन्शन योजनेवरुन केंद्रीय कर्मचारीच नाहीतर राज्यातील कर्मचारी पण आक्रमक झाले आहेत. त्यांनी नवीन पेन्शन योजनेला नकारघंटा दिली आहे. त्यातच केंद्राने नवीन पेन्शन योजनेत अमुलाग्र बदल करण्यासाठी समिती नेमली आहे.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजनेचा फायदा मिळू शकतो. नवीन पेन्शन योजने लागू असतानाही कर्मचाऱ्यांना एक सवलत देण्यात आली आहे. त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो. केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडीचा पर्याय देण्यासंबंधी एक समिती नेमली आहे. ही समिती नवीन निवृत्ती योजनेला जुनी निवृत्ती योजनेप्रमाणेच लोकप्रिय करण्यासाठी आराखडा तयार करत आहे. यामध्ये हमीपात्र उत्पन्नावर भर देण्यात येणार आहे.
जुनी पेन्शन योजनेत अनेक फायदे आहेत. जुनी पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना वेतनाच्या अर्धी रक्कम पेन्शन म्हणून मिळते. नवीन पेन्शन योजनेत मूळ वेतन+डीएचा 10 टक्के हिस्सा कपात होतो. जुनी पेन्शन योजनेत पगारातून कोणतेही डिडक्शन होत नाही. नवीन पेन्शन योजनेत 6 महिन्यानंतर डीएची तरतूद नाही. जुनी पेन्शन योजनेची रक्कम सरकारच्या तिजोरीतून देण्यात येते. नवीन पेन्शन योजनेत निश्चित पेन्शनची हमी नाही
