जालना : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन जाळीवर उडी मारली. नरहरी झिरवाळ यांच्यासह आणखी काही आदिवासी आमदारांनी देखील उडी मारली होती.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर काढणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. या जीआरला विरोध करण्यासाठी झिरवाळ यांच्यासह काही आदिवासी आमदारांनी निषेध नोंदवला आहे. दरम्यान याबाबत आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांचे काही मंत्री, खासदार, आमदार मराठ्यांकडे लक्ष देत नाहीत. मरणाचा पैसा गरिबांच्या जीवावर कमावला. आता त्यांना गरिबांची गरज नाही. झिरवळ साहेब जातवान आहेत, त्यांना गरिबांची गरज आहे. झिरवळ साहेब आधी त्यांच्या जातीला किंमत देतात. आमच्यात काही जातवान नाहीत, त्यांना नेता आणि पक्ष लागतो, गरिबांची गरज नाही. मराठा आरक्षणावर न बोलणाऱ्या मराठा नेत्यांना यावेळी मराठा समाज बुक्का लावणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे यांनी आमदारांना दिला.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले, मराठ्यांचे काही मंत्री, खासदार, आमदार मराठ्यांकडे लक्ष देत नाही अशी खंत मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलीय. मरणाचा पैसा गरिबांच्या जीवावर कमावला, आता त्यांना गरिबांची गरज नाही असं म्हणत जरांगे यांनी मराठा आरक्षणावर न बोलणाऱ्या मराठा नेत्यांवर निशाणा साधलाय. झिरवळ साहेब जातवान आहेत, त्यांना गरिबांची गरज आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय. झिरवळ साहेब आधी त्यांच्या जातीला किंमत देतात असं म्हणत आमच्यात काही जातवान नाही अशी खंत जरांगे यांनी बोलून दाखवलीय. यावेळी मराठा आरक्षणाबाबत न बोलणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांना मराठा समाज बुक्का लावणार आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.
