छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी नाकारली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, त्यानंतर किशनचंद तनवाणी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी अंबादास दानवे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत दिली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळला.
दुसरीकडे शिवसेनेचे (ठाकरे) भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची आणि महाड आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांची देखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत ठाकरे गटाने तीन मोठ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे
