शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर….

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष सत्तास्थापनेसाठी आघाडीमध्ये आले. त्यानंतर दोन पक्षांचे दोन तुकडे झालेले पाहायला मिळाले. जे कालपर्यंत विरोधी पक्षनेते होते, ते मंत्री झालेले पाहायला मिळाले.

या सर्व पार्श्वभूमीनंतर आता २०२४ च्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकानंतरही कोणता पक्ष कुठे असेल? हे सांगता येत नाही, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. तसेच शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

मुंबई तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवाब मलिक यांनी अनेक दावे केले आहेत. तसेच सध्याच्या राजकारणावर खळबळजनक विधानही केली आहेत. निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे.

या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे

Leave a Comment