मोठी बातमी! “या” गावातील गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार 

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णी गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावातील प्रश्न सुटत नसल्याने गावकऱ्यांनी एकत्रित येत निर्णय घेतला आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मतदान करण्याचे आवाहन देखील या अनुषंगाने करण्यात येत असून सकाळपासून सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेत अनेक मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडत आहेत. मात्र गावात सुविधा पुरविल्या जात नसल्याने ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकत आहेत. मेळघाट परिसरातील सहा गावातील नागरिकांनी बहिष्कार टाकला आहे. यानंतर लातूर जिल्ह्यातील टेम्भूर्णी या गावातील नागरिकांनी देखील बहिष्कार टाकल्याचे समोर आले आहे.

स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित 

मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी गावकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. अनेकदा आंदोलन करून आणि निवेदन देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. या गावात ९२३ इतकी मतदार संख्या असून येथे मतदान झाले नाही; तर मतदानाच्या टक्केवारी व उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment