संगमनेर – राज्यात महाविकास आघाडीला खूप चांगले वातावरण असून मला खात्री आहे की आम्ही 180 जागा पार करू शकतो आणि मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच बसेल असा विश्वास काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. जोर्वे या गावी मतदान करण्यास जाण्यापूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिकपणे संवाद साधताना आमदार थोरात म्हणाले, माझ्या दृष्टीने कोणी दावे केले असतील, कोणी बोलले असेल. पण आम्हांला महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवणे प्राधान्याचे आहे.
एकदा महाविकास आघाडी आली की कोणीही मुख्यमंत्री होवू आणि चांगले सरकार चालवू. मंत्री विखे यांच्याकडे बख्खळ माया जमा झाली आहे. त्याच आधारावर दुसर्यांना संपवून टाकू अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न त्यांचा होता. मात्र, तो फोल ठरला आहे. या जनतेने दाखवून दिले की येथे काही चुकीचे चालत नाही, अशी टीकाही त्यांनी विखे परिवाराचे नाव न घेता केली
