पारनेर (DSNews24) २०२३/२०२४ या गळीत हंगामात मौजे देसवडे, मांडवे खुर्द, आणि परिसरातून शेतकऱ्यांचा ऊस मोठया प्रमाणात माळकुप येथिल ग्रीन एनर्जी लिमिटेड या कारखान्यास देण्यात आला होता.ऊसाची तोडणी करण्या अगोदर कारखान्याचे एम डी यांनी गावा-गावात मीटिंग घेऊन शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की, तुमच्या ऊसाला ईतर कारखान्या प्रमाणे दर देऊ पण मागिल हिशोब बाकी असतानाच चालू हंगामातील ऊस तोड चालु केली आहे. शेजारील संगमनेर कारखान्याने अंतिम दर ३००० रु दर दिला आहे, तरी आपण दिलेल्या शब्दाप्रमाने उर्वरीत २०० रू टणा प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देण्यात यावे.
तसेच चालु वर्षीचा कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असुन कारखान्याने कोणत्याही प्रकारे दर जाहीर न करता ऊस तोड चालु केली आहे त्यामूळे शेतकरी संभ्रमाअवस्थेत आहे तरी आपण चालु हंगामाचा दर जाहीर करून मगच ऊस तोड सुरू करावी .दोन्ही मागण्यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा या मागणीचे निवेदन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे चेअरमन महेश करपे यांना देण्यात आले.
या वेळी सरपंच पोपट दरेकर, चेअरमन संतोष टेकुडे, दत्ता फटांगरे, मा. चेअरमन संजय भोर, अविनाश भोर, संतोष काकडे, संपत फटांगरे, अण्णा भोर, भाऊसाहेब खाडे, मंजाबापू वाडेकर, बाबासाहेब टेकुडे, रावसाहेब गोळे, महिपती दरेकर, नवनाथ जाधव यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
