महागाईचा झटका! गॅस सिलेंडर महागला

नोव्हेंबर महिना संपुष्ठात आला असून आजपासून डिसेंबर महिन्याला सुरूवात झाली आहे. या डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे.

एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी झाली आहे.त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला खात्री बसणार आहे.दरम्यान घरगुती आणि व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलेंडर किती रूपयांनी महागला आहे? हे जाणून घेऊयात.

तेल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. या वाढीनंतर कंपन्यांनी सर्व शहरांमध्ये सुधारित किमती जारी केल्या आहेत. त्यानुसार 19 किलोचा एलपीजी सिलिंडर सुमारे 18 रुपयांनी महागला आहे. दरम्यान याआधी नोव्हेंबरमध्ये देखील सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

याचा फटका व्यावसायिक सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना बसला आहे. तर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे घरगुती गॅस धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment