माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन

नाशिक : ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली.

ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधुकर पिचड यांचं नाव आदराने घेतलं जातं. मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीत असताना प्रदेशाध्यक्ष पद भुषवलं होतं. त्यानंतर त्यांनी आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून कार्यभार पाहिला होता.

Leave a Comment