बिग ब्रेकिंग! मांडवे बुद्रुक येथील “त्या” घटनेत एवढ्या जणांचा मृत्यू, नावे समोर … 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे चांदशावली दर्गाहच्या घुमटाला कळस चढवण्याचे काम सुरू असताना बुधवारी दुपारी अडीच वाजता घुमटाचा स्लॅब कोसळल्याने एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन कामगार जखमी झाले. त्यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

सुभाष तुकाराम नरवड, वय 22, असे मृताचे नाव आहे, तर अनिल गोयल तिरवडल, वय 25 हा गंभीर जखमी असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अमोल व्यंकटी चुडामन, वय 18, बालाजी मारुती गुलवड, वय 30 असे जखमींची नावे आहेत. सर्व कामगार नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

गंभीर जखमी कामगारांना कुटे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार चालू असताना सुभाष तुकाराम नरवडे यांचा मृत्यू झाला. अनिल तीरवडल याची प्रकृती चिंताजनक आहे.

Leave a Comment