साईबाबांच्या जयघोषात बिरेवाडी येथून पायी दिंडी होणार शिर्डीकडे मार्गस्थ 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील साईराम गृपच्या वतीने दरवर्षी श्री क्षेत्र बिरेवाडी ते श्री क्षेत्र शिर्डी असे साईबाबा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी देखील साईराम गृपच्या वतीने या पायी दिंडी सोहळ्याची भव्य तयारी केली आहे. या पायी दिंडी सोहळ्याचे यंदाचे २० वे वर्ष आहे. 

पायी दिंडीचे प्रस्थान वार – रविवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बिरेवाडी गावठाण येथील हनुमान मंदीरापासून होणार आहे. प्रस्थानवेळी भव्य आरती देखील होणार असून त्यानंतर साईबाबांच्या जयघोषात शिर्डीकडे ही दिंडी मार्गस्थ होणार आहे. तसेच पहिला मुक्काम पानोडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात होणार आहे. तसेच दिंडीचा दुसरा मुक्काम वार – सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी लोणी येथील श्री लोमेश्वर मंदिर या ठिकाणी होणार आहे.

तसेच तिसरा मुक्काम थेट शिर्डीत ३१ डिसेंबर रोजी होणार असून या दिवशी नववर्षाच्या निमित्ताने दिंडीतील सर्व साईभक्त साईबाबांच दर्शन घेणार आहे. दरम्यान दिंडीतील साईभक्तांसाठी ठिकठिकाणी अन्नदाते अन्नदान करणार आहे. तसेच दिंडीत रथापासून ते वाहतूक व्यवस्थेपर्यंत सौजन्य म्हणून काही साईभक्तांनी हातभार लावला आहे. या पायी दिंडी शेकडो तरूण सहभागी होत असतात. जवळपास साईराम गृपच्या वतीने २० वर्षांपासून ही एक परंपरा अविरत चालू ठेवली आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन मदतीचा हात देखील साईराम गृप पुढे करत असते.

मात्र या दिंडीत सहभागी होण्यासाठी साईराम गृपचे अध्यक्ष नानासाहेब भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र फासाटे, सचिव दत्ता गुंड, सहसचिव नाना ढेंबरे, खजिनदार किरण पठारे व संजय सागर यांनी आवाहन केले आहे.

Leave a Comment