पारनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील कर्जुले हर्या येथील हरेश्वर माध्यमिक विद्यालयात १९९७ साली दहावीला शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची तब्बल २७ वर्षांनी पुन्हा शाळा भरलीय. कारण या विद्यार्थ्यांनी ढवळपुरी येथील अंकुर व्हॅली या ठिकाणी स्नेह मेळावा आयोजित करत एकत्र आल्याचे बघायला मिळाले. तब्बल २७ वर्षांनी एकमेकांना भेटल्यानंतर सर्वजण भावूक झाले होते.
यावेळी लहानपणीच्या शाळेतील आठवणींना उजळा देत अतिशय आनंदीमय वातावरणात हा स्नेह मेळावा पार पडला. यातील काही उच्च पदस्थ म्हणून पुणे, मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत तर काहींनी देशाची सेवा करत मिलिटरी रिटायर आहेत तर काही व्यवसाय व शेती करतात.
यावेळी सर्व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. पण या सत्तावीस वर्षाच्या काळामध्ये पाच जणांचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाला, त्यांचीही आठवण काढत त्यांना सर्वांनुमते श्रद्धांजली वाहण्यात आली. यातील काही जणांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने सर्वांनी मनोगत व्यक्त करताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही शाळा परत भरवण्यासाठी गोपाळा दातीर व विलास कोकाटे यांनी मेहनत घेतली. या वेळी संतोष वाडेकर, प्रमोद चिंतामणी, विलास कोकाटे, गोपाळ दातीर, यदुनाथ वाफारे, बापू दातीर, हिराबाई दाते, योगिता उंडे, ललिता शिंदे, अर्जुन वाफारे, संदीप मुळे, संतोष खैरे, राजेंद्र माने, संदीप उंडे, अर्जुन वाफारे, संतोष गोडसे, शंकर कासुटे, दत्ता ठोकळ, प्रतिभा आंधळे, कविता कोकाटे, नारायण शिंदे, छाया माने, वंदना उंडे, निशा आंधळे, नारायण जडगुले, सुनीता काळे, बाबाजी गायखे, वसंत गायखे, नवनाथ गांजे, नंदा हुलावळे, अनुसया गोडसे, विकास दाते, मल्हारी उंडे, बाळासाहेब उंडे, भिमराज मुळे, संतोष आंधळे , गंगाराम घुले यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
