बिग ब्रेकिंग! अजितदादांची “ती” मागणी शरद पवारांनी केली मान्य…..

आज २३ जानेवारीला पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना, कारखान्याच्या चालकांना आणि संबंधितांना संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी संस्था आणि सरकारमध्ये व्यवस्थित समन्वय साधण्याची गरज आहे, तसेच काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे म्हणत मदतीची ग्वाही दिली आहे.

तसेच अजित पवारांनी यावेळी शरद पवारांकडे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते ती वाढवावी अशी मागणी केली होती ती मागणी शरद पवारांनी याच कार्यक्रमामध्ये मान्य केली आहे.

पुण्यामध्ये पार पडलेल्या शुगर इन्स्टिट्यूट च्या ४८ व्या वार्षिक सभेमध्ये अजित पवार म्हणाले, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये दिली जाते. आज या दहा हजाराला फारशी किंमत उरलेली नाही. त्यामुळे ती रक्कम एक लाख रुपये करण्याची मी विनंती करतो. अर्थात कधी करायची याचा निर्णय शरद पवार हेच घेतील, अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केली आहे. ही मागणी शरद पवारांनी मान्य केली आहे. याबाबतची वाढ केल्याची माहिती भाषांतून देण्यात आली.

यावर शरद पवार म्हणाले की, आतापर्यंत वैयक्तिक कामगिरीबद्दल संस्थेकडून दिले जाणारे पुरस्कार दहा हजार रुपयांचे होते. आजपासून त्यांची रक्कम वाढवून एक लाख रुपये असेल. अंबालिका साखर कारखान्याला देण्यात येणाऱ्या पुरस्काराची रक्कम दोन लाख होती, ती आता पाच लाख रुपये असेल. अजित पवारांनी भाषणात वैयक्तिक पुरस्कारांची रकम दहा हजार रुपयांवरून ती वाढवून एक लाख करण्याची मागणी केली होती. शरद पवारांनी ही मागणी लगेच मान्य केली. तर अजित पवारांच्या अंबालिका या खाजगी कारखान्याला बक्षिसाची रक्कम वाढवून दोन लेखांवरून पाच लाख रुपये देण्यात येईल असेही जाहीर केले.

Leave a Comment