मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
सिंह : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
तूळ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
वृश्चिक : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
धनू : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
मीन : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
