पारनेर (DSNews24)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व रमेश फिरोदिया कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साकुर ता- संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक स्थळे दत्तक योजना अंतर्गत ऐतिहासिक स्थळ संवर्धन एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा पळशी ता.पारनेर येथे आज संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयामधील 57 विद्यार्थी व आयोजक महाविद्यालयाचे 50 असे एकूण 107 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेचे पहिले पुष्प इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष खेडेकर यांनी ऐतिहासिक स्थळे संवर्धन काळाची गरज या विषयावर गुंफले. व स्वयंसेवकांना अनमोल असे मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना संगमनेर शहराचा इतिहास व त्या संदर्भातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दाखले त्यांनी दिले.दुसरे पुष्प संगमनेर महाविद्यालयाचे प्रा.संदिप देशमुख यांनी गडकोट किल्ले संवर्धन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रति पंढरपूर पळशी या गावाचा इतिहास त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडला.
या कार्यक्रमासाठी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. दिपकजी फिरोदिया, सरपंच मा.प्रकाश राठोड, राही रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष मा. मिठूशेठ जाधव, नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा. जालिंदर आहेर, मलवीर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. काळे सर, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. हेमलता राठोड, एस. एम. बी. एस. टी महाविद्यालयाच्या प्रो. डॉ. संगीता दंडवते, आश्वी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमित शिंदे, धन्वंतरी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जमील शेख, संत कोंडाजी बाबा महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अरुण वाकचौरे,नंदू शिंदे, जय मल्हार देवस्थानचे सचिव कारभारी आहेर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेसाठी के.जे सोमय्या महाविद्यालय कोपरगाव, अगस्ती महाविद्यालय अकोले, संगमनेर महाविद्यालय संगमनेर,श्री. ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय संगमनेर, कला, वाणिज्य व विज्ञान आणि संगणक शास्त्र महाविद्यालय आश्वी खुर्द, धन्वंतरी महाविद्यालय ढवळपुरी, श्री. छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेज नेप्ती अहिल्यानगर, नूतन महाविद्यालय राजापूर,संत कोंडाजी बाबा महाविद्यालय कोतूळ, एस.एम. बी. एस. टी महाविद्यालय संगमनेर, आश्विन महाविद्यालय मांची हिल येथील स्वयंसेवक सहभागी झाले होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. हेमलता राठोड यांनी स्वयंसेवकांना या कार्यशाळेचा उद्देश व ऐतिहासिक स्थळे संवर्धनाची स्थळे संवर्धनाची आवश्यकता याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने त्यांनी स्वागत केले. सर्व स्वयंसेवकांनी संपूर्ण परिसर स्वच्छता केली.शिबिरासाठी आलेल्या स्वयंसेवकांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच प्रो.डॉ.संगीता दंडवते, प्रा. अमित शिंदे प्रा. जमील शेख या कार्यक्रम अधिकारी यांनी देखील मनोगत व्यक्त करून या कार्यशाळा आयोजनाचे व नियोजनाचे कौतुक केले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन अर्पिता पुरी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. पोपट खेमनर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.म्हतू खेमनर यांनी मानले.
सह कार्यक्रम अधिकारी प्रा.योगेश साळुंके, प्रा. राजेंद्र लेंडे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. गणेश साळुंके, प्रा. कल्पना शेळके, प्रा. जया राशिनकर प्रा. वृषाली डोखे, प्रा.सिरीन शेख, प्रा. आरजू शेख, प्रा. लक्ष्मण कातोरे, प्रा. शंकर राशिनकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. सर्व स्वयंसेवकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
