देसवडेत मोठी खळबळ, शेतकऱ्यावर भर सकाळी हल्ला

पारनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील खडकवाडी येथील इयत्ता चौथी शिकणारी ईश्वरी पांडुरंग रोहकले हिचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच देसवडेत पुन्हा एका बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडलीय. योगेश बाबाजी गोळे(वय ३२) यांच्यावर बिबट्याने हल्ला करत जखमी केले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, देसवडे शिवारातील गोळे वस्ती या ठिकाणी योगेश गोळे आज सकाळी ७.३० वाजता शेतात पाणी भरण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याने झडप घालत योगेश गोळे यांच्या हाताला चावा घेत जखमी केले. त्यानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत योगेश गोळे यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान परिसरात बिबट्याचा संचार वाढत चालल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Leave a Comment