अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर : गावातील सोसायटीकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत, या नैराश्यातून तालुक्यातील दरडवारी येथील बाबासाहेब रामभाऊ दराडे (वय ६३) यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली.

शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायच्या गाव पातळीवर असतात. अशाच सोसायटीकडून दराडे यांनी कर्ज घेतले होते. त्यांची नेमकी थकबाकी किती होती, हे अद्याप समोर आले नाही.

मात्र, या कर्जाच्या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे पुतणे विक्रम लक्ष्मण दराडे यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Leave a Comment