Weather Forecast :  महाराष्ट्रातील ‘या’ भागात मोठा अलर्ट, आजपासून……

Weather Forecast : चक्रीय वार्‍याची स्थिती सक्रिय झाल्याने देशातील काही राज्यांसह महाराष्ट्रात देखील अवकाळीचे सावट निर्माण झाले आहे.

दरम्यान, आज (दि. ७) पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेडला आज ऑरेंज अलर्ट (Weather Forecast देण्यात आला असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तर मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हयात ढगाळ वातावरण असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

राज्यात उत्तर कोकण, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड वगळता उर्वरित राज्यात ८ एप्रिलला अवकाळी पाऊस पडणार आहे. तर ९ एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काही प्रमाणात अवकाळीचा इशारा (Weather Forecast) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे

Leave a Comment