संगमनेर(DSNews24/किरण पुरी) : तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे विमा प्रतिनिधी सुभाष रामदास भुजबळ यांना सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षाचा ‘शतकवीर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षाच्या कालावधीत सुभाष भुजबळ यांनी पठारभागातील १०० हून अधिक जणांचे विमा उतरवल्याने त्यांचा आर्थिक वर्षाच्या शतकवीर पुरस्कारात बाजी मारली आहे. गेल्या १८ वर्षांपासून सुभाष भुजबळ साकूरसह पठारभागात भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे विमा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. तसेच सर्वसामान्य व इतर लोकांपर्यंत पोहचत त्यांचा विमा उतरवण्याच काम करत आहे. तसेच अनेक लोकांना विमा अंतर्गत योजना मिळवून दिल्या आहेत.
तसेच आजपर्यंत सुभाष भुजबळ यांनी पठारभागातील २ हजार लोकांना विमा व आरोग्य विमा देण्याचे मोठ काम केले आहे. त्यामुळे हजारो नागरिक त्यांच्याकडे जोडले गेले आहे. तसेच आगामी काळात १० हजारहून अधिक लोकांपर्यंत विमा व आरोग्य विमा पोहचविण्याचा सुभाष भुजबळ यांचा मानस आहे. तसेच चार वर्षांपूर्वी त्यांनी साकूरला विमाग्राम पुरस्कार मिळवून दिला होता. भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत असणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना सुभाष भुजबळ मिळवून देत आहे. परंतु आजच्या स्थितीत साकूरसह पठारभागात लोकसंख्येच्या तुलनेत फक्त २ ते ३ टक्केच लोकांनी विमा उतरवला असून यात वाढ होण्याची आवश्यकता आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात विविध प्रसंग, अपघात, आजारपण, नैसर्गिक आपत्तीमुळे घडणाऱ्या घटना आदि , पाहता सद्यस्थितीत प्रत्येक कुटुंबातील कर्ता पुरुष व कुटुंबातील सदन व्यक्तीने आपल्या उत्पादनानुसार स्वतःचा व कुटुंबातील व्यक्तींचा जीवन विमा उतरवणे गरजेचे आहे.
आजची जीवन पद्धती बघता प्रदूषण, रासायनिक प्रक्रिया केलेले अन्न (फास्ट फूड) तसेच पालेभाज्या ह्यातून कॅन्सर चे प्रमाण वाढले आहे. या उपचारांसाठी मोठा आर्थिक खर्च देखील होत असतो. यासाठी एल आय सी कडे कॅन्सर कव्हर हा अत्यंत स्वस्त असा कॅन्सर या आजारांवरील उपचारासाठी प्लॅन उपलब्ध आहे. कारण आरोग्य विमा ही सुद्धा काळाची गरज बनली असून महागडे खर्च, उपचार आणि अचानक होणारे अपघात ह्यासाठी आरोग्य विमा घेण्याचे आवाहन विमा प्रतिनिधी सुभाष भुजबळ यांनी केले आहे. तसेच जनतेला आर्थिक मदत, मानसिक, तणावमुक्त जीवन जगण्यासाठी हातभार लावण्याचे काम पुर्णत्वास नेण्याचा संकल्पही सुभाष भुजबळ यांनी केला आहे.
तसेच भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत असणाऱ्या जीवन लाभ, जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन अमर, मनी बॅक प्लॅन, पेन्शन पॉलिसी, कॅन्सर कव्हर, कन्यादान पॉलिसी, टर्म इन्शुरन्स, अशा विविध लोकप्रिय योजना असून उपलब्ध असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ९९२१९९८१८६ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन देखील सुभाष भुजबळ यांनी केले आहे.
दरम्यान, सुभाष भुजबळ यांना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षाचा ‘शतकवीर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल साकूरसह पठारभाग, सर्व विमा ग्राहक व ग्रामस्थ, नागरिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.
