बिग ब्रेकिंग! बस स्थानकाचं छत शिवशाही बसवर कोसळल

नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वारा आणि पावसाच्या तडाख्यानं सिन्नर बस स्थानकाचं छत शिवशाही बसवर कोसळल्याची घटना घडलीय. बसमधील प्रवाशी जखमी झालेत.

तुफानी पावसामुळे सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बसस्थानक रिकामा करण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना देखील बाहेर काढण्यात आले आहे.

तर या घटनेमुळे सिन्नर शहरातील सर्व रस्ते बंद झाले असून, वाहतूक ठप्प झालीय. हे बसस्थानक सिन्नरचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निधीतून उभारण्यात आले आहे.

Leave a Comment