साकूरच्या जिल्हा परिषद शाळेत निलम खताळ आल्या अन्……

संगमनेर – महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागा च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६’ या उपक्रमांतर्गत संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नव निर्वाचित आ. अमोल खताळ पा.यांच्या सुविद्य पत्नी सौ.निलमताई खताळ यांनी सोमवारी साकूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

यावेळी शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश देऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. तसेच यानिमित्ताने आमदार अमोल खताळ पा.यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी शुभेच्छारुपी दिलेल्या शालेय साहित्याचे वाटप गरजु विद्यार्थ्यांना सौ.निलमताई खताळ पा.यांच्या हस्ते करण्यात आले.

सौ.निलम खताळ पा.यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधुन नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधुन चांगले शिक्षण मुलांना मिळत असुन यापुढे देखील आमदार अमोल खताळ व पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या माध्यमातुन जि.प.च्या शाळांना लागणार्‍या मुलभुत सुविधा कमी पडु देणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन निधीतुन शाळेला दिलेल्या डिजिटल इंटर अॅक्टिव्ह बोर्ड ची ही पाहणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.रऊफ शेख,भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, मच्छिंद्र खेमनर, भिमराज जाधव ई.कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शालेय प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापिका श्रीमती शायदा शेख यांनी सौ.निलमताई खताळ यांचा सत्कार केला.यावेळी पं.स.चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.कल्याण राऊत, केंद्रप्रमुख श्री.भोसले सर, संतोष झावरे सर, संतोष जाधव सर, विकास मिसाळ सर, हासे मॅडम, कोंडार मॅडम, गोसावी मॅडम ई.शिक्षक वृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment