तब्बल चार वर्षांनंतर रविंद्र राजदेव यांची ‘या’ घटनेतून निर्दोष मुक्तता 

अहिल्यानगर(DSNews24/किरण पुरी) पारनेर तालुक्यातील निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. गेल्या चार वर्षांपूर्वी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रविंद्र राजदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र या प्रकरणातून आता चार वर्षांनंतर रविंद्र राजदेव यांची नगर येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. राजदेव यांच्या बाजूने ॲड. राहुल झावरे यांनी युक्तिवाद केला.

नेमकं काय घडल? 

पारनेर तालुक्यातील नांदूर पठार येथे महावितरणच कर्मचारी थकबाकी वसूली करण्यासाठी आले होते. यावेळी रविंद्र राजदेव यांनी मला न विचारता लोकांचे आकडे का काढले अशी विचारणा महावितरणच्या कर्मचाऱ्याला केली. त्यानंतर यावरून रविंद्र राजदेव यांनी कर्मचाऱ्याला दमबाजी करत मारहाण केली. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रविंद्र राजदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान रविंद्र राजदेव यांची पारनेर तालुक्यात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. कारण कायमच वेगवेगळ्या विषयांवर ते आवाज उठवत असतात. नुकतेच पेमदऱ्यातील कला केंद्राचा आवाज उठवत ते बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Leave a Comment