प्रहारच्या चक्काजाम आंदोलनास शिवप्रतिष्ठाणचा जाहीर पाठिंबा, राहुल ढेंबरे यांनी केली ‘ही’ मागणी

मुंबई(DSNews24/किरण पुरी) प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वात २४ जुलै २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्राभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, त्यासाठी शेतकरी कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठाणचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी प्रहारचे प्रमुख बच्चूभाऊ कडू यांना आपण सुरू केलेले हे आंदोलन म्हणजे लोकशाही मार्गाने जनतेच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा संघर्ष आहे. गुरुकुंज – मोझरी येथून सुरू झालेला हा लढा आता संपूर्ण राज्यातील लोकांच्या भावना व हक्कांचे प्रतीक ठरतो आहे. आपल्या शांततेच्या मार्गाने सुरू असलेला चक्काजाम आंदोलनाला मी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे आणि केंद्र व राज्य सरकारने याकडे तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी माझी आग्रही मागणी आहे.

या आंदोलनातील मागण्या केवळ राजकीय नव्हे तर त्या सामाजिक न्यायाशी निगडित आहेत जर शासनाने याकडे दुर्लक्ष केले तर हा असंतोष व्यापक प्रमाणावर उफाळून येईल आणि त्यास शासनच जबाबदार असेल, आपल्या संघर्षास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा व शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment