शिबलापूर – संजय मुन्तोडे यांच्या उपोषणावर तोडगा नाहीच, नागरिक संतप्त 

संगमनेर (DSNews24 /किरण पुरी) घरकुल योजनेच्या नावाखाली संगमनेर तालुक्यात व शिबलापुर, माळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही महसूल प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय तबाजी मुन्तोडे यांनी थेट आमरण उपोषणाच हत्यार उपसले आहे. संजय मुन्तोडे २१ जुलैपासून शिबलापूर येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

वाळूमाफियांविरोधात संजय मुन्तोडे यांनी थेट आमरण उपोषणाच हत्यार उपसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मात्र दोन दिवस उलटून गेले तरी देखील महसूल प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली नव्हती, परंतु उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी उपोषणस्थळी भेट दिली. परंतु कुठलाच तोडगा निघाला नाही. जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणावर ठाम असल्याच संजय मुन्तोडे यांनी सांगितले.

तसेच प्रवरा नदीच्या पात्रातून महसूलच्या नियमांचा भंग करून बेकायदेशीरपणे अनधिकृत पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या नावाखाली खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनेक महिन्यांपासून अवैध वाळूचा उत्कखन सुरू असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोडे यांनी अनेकदा आवाज उठवला. याबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही कोणतीही दखल घेतली नाही. कारण यात महसूल व वाळू तस्कऱ्यांचे हातमिळवणी असल्याचा आरोप संजय मुन्तोडे यांनी केला आहे.

त्यामुळे त्यांची देखील चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र सलग तीन दिवसांपासून संजय मुन्तोडे यांच आमरण उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती हळूहळू खलावत चालली आहे. तसेच जर संजय मुन्तोडे यांच्या आमरण उपोषणावर लवकर तोडगा निघाला नाही आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सदर विषय गंभीर असून महसूल विभागाच्या वतीने काय निर्णय घेतय याकडेच लक्ष लागले आहे.

Leave a Comment