शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात महाराष्ट्रात शेतकरी एकवटणार 

पुणे(DSNews24 /किरण पुरी) येथे शेतकरी हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या सोईची पीक विमा योजना, शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतीला मजूर पुरवने, अशा असंख्ये प्रश्नांवर चर्चा झाली व महाराष्ट्रातील सर्व संघटनाची वज्र मूठ बांधून मोठा लढा ऊभा करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. १६ ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथून मोठी घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी DSNews24 शी बोलताना दिली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी, प्रहार संघटनेचे बच्चू कडू, किसान सभेचे अजित नवले, आमदार बाबासाहेब देशमुख, धाराशिव मतदार संघाचे आमदार कैलास पाटील, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर, अनिल घनवट, विठ्ठल पवार, बाळशिराम पायमोडे, सुभाष पाटील करंजुले, अन्सार पटेल, अरुण वाळुंज, बाळासाहेब वाळुंज, वसंत साठे, यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment