संगमनेर मतदारसंघातील विकासकामांच्या मुद्द्यावरून माजी खासदार सुजय विखे यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला. यावर बोलताना थोरात म्हणाले की मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो. बोलताना हे वयाचा मान नसतील राखत पण मला मात्र पोराबाळांवर चर्चा करायला नका लावू, अशा शब्दांत माजी मंत्री थोरात यांनी सुजय विखेंना टोला लगावला.
निळवंडेचे काम व भोजापुरी चारीच्या कामावरून सत्ताधाऱ्यांकडून थोरातांवर टीका केली जात आहे. यावरत बोलताना थोरात म्हणाले की निळवंडेचे काम कोणी केले व भोजापूर चारीचे काम कोणी केले हे जनतेला माहिती आहे ते काही आंधळे नाहीत. मे-जून महिन्यामध्ये पाणी आलं हे काही ह्यांचे कर्तुत्व नाही. दोन्ही कामे आम्हीच केलेले आहेत असे थोरात यांनी स्पष्ट केले.
