आनंदगड येथील विद्यार्थीनींच्या ‘त्या’ कृत्याने सुजय विखे भावूक

अकोले (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील वीरगाव येथील आनंदगडच्या आनंद गुरुकुल विद्यार्थ्यांची श्रावणी सोमवार निमित्त निसर्गसहल व वीरेश्वर महादेव मंदिर दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या निसर्गसहलीत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मात्र विद्यार्थी ज्या मार्गावरून जाणार होते योगायोगाने त्याच मार्गावरून आपल्या कार्यक्रमा निमित्ताने अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे देवठाणहून पिंपळगाव निपाणी कडे वीरगाव मार्गे मोटारीने जात होते. यावेळी सुजय विखे यांची विद्यार्थिनींनी रस्त्यातच गाडी थांबवून त्यांचं अनोखं स्वागत केले. या स्वागताने सुजय विखे अक्षरशः भारावून गेले होते.

मात्र यावेळी डॉ. सुजय विखे या मार्गावरून जात आहेतच तर आपण त्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करायचे का? अशी संकल्पना अधिक्षिका तमन्ना शेख यांना सुचली. त्यानंतर अगदी काही मिनिटांतच राख्या उपलब्ध करण्यात आल्या. यावेळी रस्त्यावरच मुलींना उभे करून डॉ विखे यांचे स्वागत करत गाडी थांबविण्याची विनंती केली.

त्यांनीही अगदी मनाचा मोठेपणा दाखवत लहानग्या मुलींचा मान राखत त्यांचे स्वागत स्विकारले व राख्या देखील बांधून घेतल्या. अचानक झालेल्या स्वागत व रक्षाबंधनाने डॉ. सुजय विखेही भारावून गेले. या अनपेक्षित रक्षाबंधनाने श्रावणी सोमवार च्या दिवशी आपल्याला खासदार भाऊ मिळाल्याचा भावना मुलींनी व्यक्त केल्या. मात्र अधिक्षिका तमन्ना शेख यांच्या या संकल्पनेच सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Comment