किर्तनकाराकडून बाळासाहेब थोरातांना धमकी, राज्यात उसळली संतापाची लाट, महाराष्ट्रातील “या” दिग्गज नेत्यांनी दिलीय प्रतिक्रिया…

अहिल्यानगर(DSNews24) माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणारे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या व्हिडिओने राज्यभर मोठी खळबळ उडाली असून भंडारे यांनी व्हिडिओद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी थेट धमकी दिली असून यामुळे आता राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या घटनेनंतर बाळासाहेब थोरातांच्या समर्थनासाठी महाविकास आघाडीचे नेते एकवटले आहे. ट्विट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

 

नेमकं कोणी काय प्रतिक्रिया दिलीय….

खासदार निलेश लंके संतापले

संगमनेर मध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तींना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. गृहमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे. राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही? कीर्तनकार आता राज्याचे महसूल मंत्री राहिलेल्या व्यक्तीला उघडपणे जीवे मारण्याची धमकी देत आहेत हे योग्य आहे का? महाराष्ट्रातील राजकारण आजपर्यंत कधीच इतक्या खालच्या थराला गेले नाही कीर्तनामध्ये विशिष्ट नेत्यांचा प्रचार करीत असेल, द्वेषाचे राजकारण जर कोणी करत असेल. तर त्याला प्रश्न विचारणे हा सुद्धा खरा धर्म आहे. जर एखादी व्यक्ती असे द्वेषाचा विचार नारदाच्या गादीवर राहुन मांडत असेल, खोट्या हिंदुत्वाच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल करत असेल.. तर त्यांना महाराज चुकीचे सांगू नका तुम्ही अभंगावर बोला हे सांगणं पण चुकीचे आहे का? असा संतप्त सवाल खासदार निलेश लंके यांनी केला.

 

संगमनेरमध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा?

कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संग्राम भंडारे यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा समाचार केला आहे, संगमनेरमध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तीना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्र्यांना आमचा सवाल आहे, राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही? कीर्तनकार आता काँग्रेस नेत्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देणार, गुन्हा दाखल करण्याची धमकी देणार हे योग्य आहे का? राजकारण एक बाजूला पण उघडपणे नेत्यांना जीवे मारण्याची धमकी कीर्तनकारांनी देणे हे सर्व मर्यादा ओलांडणे आहे. महाराष्ट्रातील राजकारण इतक्या खालच्या थराला कधीच गेले नव्हते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

आमदार सत्यजीत तांबे

सत्यजीत तांबे यांनी संग्राम भंडारे यांना उत्तर देत म्हटलंय, बाळासाहेब थोरात साहेबांवर टिका करताना विरोधक सुध्दा जपून शब्द वापरतात त्यामुळे संत-महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात स्वतः ला कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या एका उध्दट व्यक्तीने त्यांच्या विषयी जे काही बोलले ते महाराष्ट्रातील कोणत्याही वारकरी संप्रदायातील किर्तनकारांना आवडलेले नाही. सहकार, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरचे नाव बदनाम करण्याचा काही घटना मागील काळात सातत्याने सुरु करण्यात आल्यात. या घटना फक्त राजकीय नाहीत किंवा फक्त थोरात साहेबांशीच संबंधित नाही, मध्यंतरी संगमनेरचे नाव देशभर प्रसिद्ध करणाऱ्या एका उद्योगपतीला त्याने ‘ होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे ‘ बोलल्याबद्दल फार वाईट भाषेत टीका सहन करावी लागली.

आज संगमनेरच्या सहकारी व सहकारी बॅंकांमधील ठेवी आज 7000 कोटींच्या घरात आहेत, संगमनेरात रोज 9 लाख लिटर दूध तयार होते, संगमनेर मधील दोनच गावात कुक्कुटपालनातून रोज 7 लाख अंडे तयार होतात, संगमनेर कारखाना राज्यातील एक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो, संगमनेरमध्ये 5 मेडिकल कॉलेज आहेत ज्यातील चार बाळासाहेब थोरातांच्या विरोधकांचे आहेत म्हणजेच येथे द्वेषाचे राजकारण नाही, संगमनेरात सगळ्या शिक्षण संस्था मिळून 25000 मुले-मुली उच्च शिक्षण घेतात. प्रवरा नदीला पाणी नसतांना संगमनेर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती आता निळवंडे धरणातून 24 तास स्वच्छ पाणी भेटते. हे काय उगाच झालेले नाही, पर्जन्य छायेच्या भागात असलेला व एके काळचा दुष्काळी तालुका आज सुजलाम सुफलाम झाला यात स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात व त्यांच्या नंतर बाळासाहेब थोरात यांचे प्रचंड योगदान आहे जे कोणीही शहाणा माणूस नाकारू शकत नाही. कालच्या तथाकथित कीर्तनकाराची टिका ही राजकीय तर आहेच पण संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे. संगमनेरची स्वाभिमानी जनता हे कधीही सहन करणार नाही !

 

आमदार जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्या वाणीने हा समाज जागृत झाला आणि पुरोगामी विचारांनी आपली परंपरा या मातीत मजबूत केली. पण आज संग्राम भंडारे सारखे तथाकथित कीर्तनकार महाराष्ट्राच्या थोर संत परंपरेचा अपमान करून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना,”बाळासाहेब थोरात आम्हाला देखील नथुराम गोडसे व्हावं लागेल हा..!” असे म्हणत थेट जीवे मारण्याची धमकी देत आहेत.

गोडसे प्रवृत्तीची ही भाषा महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही.संत परंपरेतून मानवतेचा धर्म शिकवला जातो, द्वेषाची भाषा नाही.बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्या कार्याचा विरोधकांनीही नेहमी आदर केला आहे. त्यांना धमकी देणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला आव्हान आहे.

भाजपच्या राजकीय डावात, धर्माच्या नावाखाली महाराष्ट्रात कलह निर्माण करण्याचा घृणास्पद प्रयत्न सुरू आहे. पण हा डाव राज्यातील वारकरी, पुरोगामी विचारवंत आणि सर्वसामान्य जनता उधळून लावेल,याची मला खात्री आहे.

महाराष्ट्राची संत परंपरा ही प्रेम, सत्य आणि अहिंसेवर आधारलेली आहे. आम्ही गोडसे प्रवृत्तीचा निषेध करतो आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत मी आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष (शरद पवार) खंबीरपणे उभे आहोत,असा शब्द देतो.

 

खासदार सुप्रिया सुळे 

कॉंग्रसचे (@INCMaharashtra) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (@bb_thorat) यांना एका व्यक्तीने व्हिडिओ करुन धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. सदर व्यक्ती ही स्वतःला प्रवचनकार म्हणविते. कीर्तन, प्रवचन करणाऱ्या व्यक्ती या वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून मानवता, सद्भावना, प्रेम यांचा प्रसार करतात.लोकांचे प्रबोधन करतात. परंतु सांप्रदायाच्या आडून हिंसक विधाने करणे अतिशय दुर्दैवी आहे. सदर व्यक्ती व्हिडीओमध्ये महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्या नथुराम गोडसे याचा उल्लेख ‘नथुरामजी’ असा करते. ही बाब त्या व्यक्तीची मानसिकता विषद करण्यास पुरेशी आहे. माझी राज्याच्या गृहमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की कृपया आपण याची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश यंत्रणेला द्यावे.

 

माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( शरद पवार गट) 

आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ या धमकीचा नेमका अर्थ काय होतो?

महाराष्ट्रातील सुसंकृत व संयमी नेते अशी ओळख असलेल्या बाळासाहेब थोरात यांना अशा प्रकारची धमकी देण्यात आलेली आहे. वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे भूषण आहे. या संप्रदायाने जगाच्या कल्याणाची शिकवण मानवजातीला दिलेली आहे. मात्र, आज या संप्रदायामध्ये काही समाजविघातक वृत्ती घुसखोरी करून त्याचा राजकीय कारणांसाठी वापर करीत आहेत. याबाबत वारकरी संप्रदायाने सजग राहायला हवे, पण त्यासोबतच अशा प्रकारे धमकी देणाऱ्या समाजकंटकांवर सरकारने कडक कायदेशीर कारवाई करायला हवी

 

महाराष्ट्र कॉंग्रेस 

स्वतःला कीर्तनकार म्हणणारा हा संग्राम भंडारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देतोय. बाळासाहेब थोरातांच्या विरोधात नथुराम गोडसे व्हावे लागेल असे म्हणतोय…

ही धमकी आहेच पण महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा, नथुराम गोडसेचा गौरव करणारी समाजविघातक कृतीही आहे! अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाच्या पवित्र नावाला काळिमा फासणारे हे संघी ढोंगी आता उघडे पडलेच पाहिजेत!

भाजप आणि त्यांच्या कट्टर संघटनांच्या छत्राखाली हे विष पेरलं जातंय! अध्यात्माच्या नावाखाली हिंसा, दहशतवाद आणि खुनाच्या धमक्या देणाऱ्या या गुंडांना कोण पाठबळ देतंय? गृहमंत्री फडणवीस हा गुन्हेगार मोकाट दिसता कामा नये.

बाळासाहेब थोरात साहेबांसारख्या सुसंस्कृत नेत्याला धमकी देणाऱ्या या भ्याडावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे! महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे. महाराष्ट्र संत, वारकरी व भक्तीच्या समतेच्या परंपरेचा आहे. नथुरामाचा गौरव करणाऱ्यांना या भूमीत स्थान नाही.

 

कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर 

स्वतःला कीर्तनकार म्हणणारा हा संग्राम भंडारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देतोय. बाळासाहेब थोरातांच्या विरोधात नथुराम गोडसे व्हावे लागेल असे म्हणतोय… ही धमकी आहेच पण महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा, नथुराम गोडसेचा गौरव करणारी समाजविघातक कृतीही आहे! अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाच्या पवित्र नावाला काळिमा फासणारे हे संघी ढोंगी आता उघडे पडलेच पाहिजेत!

भाजप आणि त्यांच्या कट्टर संघटनांच्या छत्राखाली हे विष पेरलं जातंय! अध्यात्माच्या नावाखाली हिंसा, दहशतवाद आणि खुनाच्या धमक्या देणाऱ्या या गुंडांना कोण पाठबळ देतंय? गृहमंत्री फडणवीस हा गुन्हेगार मोकाट दिसता कामा नये.  बाळासाहेब थोरात साहेबांसारख्या सुसंस्कृत नेत्याला धमकी देणाऱ्या या भ्याडावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे!

महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे. महाराष्ट्र संत, वारकरी व भक्तीच्या समतेच्या परंपरेचा आहे. नथुरामाचा गौरव करणाऱ्यांना या भूमीत स्थान नाही ..

 

महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 

काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेबांना जीवे मारण्याची धमकी!

तथाकथित किर्तनकार संग्राम भंडारे हा नथुराम होण्याची भाषा करून बाळासाहेब थोरांत यांना खून करण्याची धमकी देतोय. अध्यात्म आणि वारकरी संप्रदायात घुसलेले संघोटे लोकांनी ओळखले पाहिजेत.

“आम्ही नथुराम होऊ “ ही भाषा म्हणजे महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा ,दहशतवादी नथुरामचा गौरव करून, थोरात साहेबांना जीवे मारण्याची सरळसरळ धमकी आहे.

भाजप व त्यांच्या कट्टर संघटनांच्या छत्राखाली हिंसेचं विष पेरलं जातंय. अध्यात्म सांगण्याच्या नावाखाली हत्या व दहशतवादाचं समर्थन होतंय.

बाळासाहेब थोरात साहेबांना धमकी देणाऱ्या या व्यक्तीवर त्वरित कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा हे स्पष्ट होईल की फडणवीसांचे भाजप सरकार अशा गुन्हेगारांना पाठिंबा देतंय.  या गाव गुंडावर कारवाई झाली नाही तर काँग्रेस गप्प बसणार नाही

1 thought on “किर्तनकाराकडून बाळासाहेब थोरातांना धमकी, राज्यात उसळली संतापाची लाट, महाराष्ट्रातील “या” दिग्गज नेत्यांनी दिलीय प्रतिक्रिया…”

  1. या रजिकिय नेत्यांना माझी विनंती आहे….. एकदा संगमनेर मध्ये येऊन बघा. संगमनेरचा फक्त देखावा केला गेला … सर्वसामान्य जनतेला थोरात साहेबांच्या दलालांकडून खूप त्रास असतो….त्यामुळेच…. सर्वसामान्य जनतेने हींदुरक्षक आमदार अमोल भाऊ खताळ साहेबांना संधी दिली आहे त्यांना काम करू द्या…

    Reply

Leave a Comment